शिवप्रहार न्यूज- दोन दिवसापासून श्रीरामपुरात एकही कोरोनाचा रुग्ण नाही;फक्त 26 पेशंट उपचार घेत आहेत…
दोन दिवसापासून श्रीरामपुरात एकही कोरोनाचा रुग्ण नाही;फक्त 26 पेशंट उपचार घेत आहेत…
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या घटत जाऊन गेल्या दोन दिवसापासून शून्यावर येऊन पोहोचली आहे.काही महिन्यापूर्वी श्रीरामपूर शहर व तालुक्यात कोरोना ने हाहाकार माजवला होता.त्या काळात सर्व रुग्णालय फुल होते. तसेच अनेकांना बाहेर गावी देखील उपचाराला जावे लागले होते.अनेकांनी त्या काळात आपल्या आप्तेष्ठांना गमावले.तेव्हा दिवसाला साडेतीनशे ते चारशे रुग्ण आढळत होते.
परंतु सध्या कोरोना मुक्तीच्या दिशेने श्रीरामपूरची वाटचाल चालू असल्याचे दिसत आहे.कालचा शनिवार व परवाचा शुक्रवार असे दोन्ही दिवस मिळून एकही करोना रुग्ण आढळून आला नाही.तसेच सध्या फक्त 26 कोरोना रुग्णांवर उपचार चालू आहे.
त्यामुळे श्रीरामपूरची वाटचाल हि लवकरच कोरोना मुक्तीच्या दिशेने जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.