शिवप्रहार न्यूज- भर पावसात अन् भरभक्कमपणे “शंभू मेळावा-०२” संभाजीनगर शहरात संपन्न…  

शिवप्रहार न्यूज- भर पावसात अन् भरभक्कमपणे “शंभू मेळावा-०२” संभाजीनगर शहरात संपन्न…   

भर पावसात अन् भरभक्कमपणे “शंभू मेळावा-०२” संभाजीनगर शहरात संपन्न…

संभाजीनगर - शिवप्रहार प्रतिष्ठान व शिव-शंभू भक्त परिवार, महाराष्ट्र यांच्या वतीने औरंगाबाद जिल्हयाचे नामकरण छ.संभाजीनगर व्हावे याकरिता बिगरराजकीय लोकचळवळ / मोहिम गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे. या मोहिमेत वेगवेगळ्या पक्षाचे व संघटनांचे अठरापगड जातीचे शिव-शंभू भक्त सामील झालेले आहे. ही मोहिम लोकशाही मार्गाने, कुठलीही हिंसा न करता, कुठलाही कायदा हातात न घेता, कुठल्याही राजकीय पक्षाला विरोध वा समर्थन न करता सुरू आहे. 

        काल दि.०५/०६/२०२२ रोजी या मोहिमेच्या माध्यमातून “शंभू मेळावा - ०२” हा कार्यक्रम दहा ते पंधरा हजार मावळ्यांच्या उपस्थितीत संभाजीनगर शहरातील वीर सावरकर मैदान येथे अतिशय भव्य-दिव्य स्वरूपात पार पडला. यावेळी उपस्थिती मावळ्यांना महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज व शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे म्हणाले की, शंभूराजांना मारणाऱ्या मारेकऱ्याचे नाव हटवावे आणि शंभू राजांचे नाव कायदेशीररित्या जिल्हयाला लागावे तसेच जोपर्यंत कायदेशीररित्या संभाजीनगर होत नाही तोपर्यंत हि संभाजीनगर नामकरण मोहिम वेगवेगळ्या लोकशाही मार्गांचा अवलंब करून चालू राहणार आहे. आमची मागणी आहे की, औरंगजेबासारखा कुर शासक ज्याने स्वतःच्या बापची, भावाची, मुलाची, पुतण्याची हत्या केली, तसेच देशाचे आराध्य दैवत शिवछत्रपतींचा आग्रा येथील दरबारात अपमान केला आणि शिवछत्रपतींचा छावा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ४० दिवस प्रचंड हालहाल करून हत्या केली. त्या औरंगजेबचे नाव हटणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या औरंगजेबला अन्याय, अत्याचार, अनैतिकता, कुरता, विश्वासघात, गुलामगिरी यांचे प्रतिक मानले गेले त्या औरंगजेबचे नाव हटवून तेथे न्याय, नैतिकता, स्वराज्य, स्वातंत्र, शौर्य, धैर्य, पराक्रम यांचा संगम असलेल्या आपल्या शंभूराजांचे नाव लावावे याकरिता आम्ही लोकशाही मार्गाने लोकचळवळ उभारून ही मोहिम राबवत आहोत. आम्ही राष्ट्रभक्त डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव हटवण्यासाठी मोहिम काढलेली नसून शंभूराजांचा मारेकरी असलेला औरंगजेबचे नाव हटवण्यासाठी हि मोहिम आहे. 

      या शंभू मेळावा - ०२ कार्यक्रमाला सर्व अठरापगड जातीचे तळमळीचे मावळे स्वतःच्या खर्चाने वाहने करून आले व उपस्थित राहीले. संभाजीनगर, नगर, जालना, जळगाव, सांगली, नाशिक भागातून हजारो मावळे येथे आले होते. भर पावसात हा कार्यक्रम पार पडला. परंतु एकही मावळा जागेवरून हटला नाही आणि उठला पण नाही.

       याच मोहिमेच्या माध्यमातून दि. ०९/०४/२०२२ रोजी आम्ही शंभू मेळावा - ०१ हा कार्यक्रम वैजापूर शहरात घेतला. तसेच नंतरच्या काळात या मोहिमेत जय बाबाजी भक्त परिवार, शांतीगिरीजी महाराज धर्मयोदधा संघ-प्रमुख नागेश्वरजी महाराज ,समस्त शिवभक्त मित्र परिवार या संघटना देखील सामील झाल्या असुन महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी ज्यामध्ये राष्ट्रीय वारकरी परिषद, हिंदू राष्ट्र सेना, हिंदवी जनक्रांती सेना, हिंदूत्व सिंहनाद, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,हिंदू साम्राज्य महासंघ, छावा ,रोड मराठा उत्थान संघटना पानिपत-हरयाणा, धर्माचार्य मेटे महाराज इत्यादी संघटनांनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

        तरी शंभूराजांच्या मारेकऱ्याचे "औरंगाबाद" हे नाव काढून शंभूराजांचे छत्रपती संभाजी महाराजनगर असे जिल्हयाचे नाव कायदेशीररित्या करावे व येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात संभाजीनगर नामकरण चा ठराव मंजूर करावा अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर धरणे आंदोलन करून मागणी पूर्ण करण्यासाठी लढा चालू राहील.