शिवप्रहार न्यूज- महावितरणच्या गलथान कारभारामुळे उस जळाला;महावितरणने भरपायी द्यावी...
महावितरणच्या गलथान कारभारामुळे उस जळाला;महावितरणने भरपायी द्यावी...
गोंडेगाव (प्रतिनिधी) श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव परिसरात शेती गट नंबर ४१८,४१९,४२०,४१७/ अ ४१६ येथे महावितरणाच्या वीजवाहक तारांचे शॉर्टसर्किट झाल्याने पूर्ण वाढ झालेल्या उसाला आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किट झाल्यामुळे सयाजी जनार्दन फोपसे यांचा ऊस जळून १ लाख रुपयाचे नुकसान झाले. तर विक्रम किशोर लबडे यांचा ऊस जळून २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्ञानदेव नामदेव बढे यांचा ऊस तसेच ठिबक सिंचन जळून २ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले. धनंजय ज्ञानदेव बढे यांचा ऊस ठिबक सिंचन जळून २ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले.परिसरातील नागरिकांनी आग विजवण्यासाठी परिश्रम घेतले .मात्र वारा असल्याने शेतकऱ्यांचे ऊस जळून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला व मोठा आर्थिक फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला.
कामगार तलाठी यांनी या जळीत घटनेचा पंचनामा केला असून त्यातही महावितरणच्या वीज तारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून उसाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे .संबंधित नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने व महावितरणने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.