शिवप्रहार न्यूज- वडाळा महादेव येथील पिंपळे कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

शिवप्रहार न्यूज- वडाळा महादेव येथील पिंपळे कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

वडाळा महादेव येथील पिंपळे कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहराजवळील वडाळामहादेव येथे काल दुपारी औं.बाद येथून एम एच २० डी व्ही ७३३० व एम एच १२ एच व्ही ९२४२ या गाडीतून आलेल्या अंदाजे २४ ते २५ जणांच्या जमावाने श्री.बबन पिंपळे यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम सुरू असतांना अचानक येऊन तलवारी, कुऱ्हाडी, गज व लाकडी दांडयांनी महिला, पुरुष व लहान मुला-मुलींना बेदम मारहाण करून, महिलांशी असभ्य वर्तन केल्याची घटना घडली होती.

       याबाबत बबन कमलाकर पिंपळे यांच्या फिर्यादीवरून काल रात्री उशिराने १३ जणांविरुद्ध गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेतले आहे.

         या सशस्त्र हल्ल्यात राजू गंगाधर चव्हाण व अनिल बबन पिंपळे हे दोघे जखमी झाल्याने त्यांच्यावर शहरातील साखर कामगार रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टे.चे उपनिरीक्षक समाधान सुरवडे व पथक हे करीत आहेत.