शिवप्रहार न्यूज-हरेगाव तीन चारीजवळ डॉक्टरची फोर व्हीलर फोडून;डॉक्टरला मारहाण…

शिवप्रहार न्यूज-हरेगाव तीन चारीजवळ डॉक्टरची फोर व्हीलर फोडून;डॉक्टरला मारहाण…

हरेगाव तीन चारीजवळ डॉक्टरची फोर व्हीलर फोडून;डॉक्टरला मारहाण…

श्रीरामपूर -श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव ते श्रीरामपूर रोडवर असणाऱ्या तीनचारी शिवारात डॉक्टर कमलेश रमेशलाल बोरा,वय 45,रा- कांदा मार्केटच्या मागे,श्रीरामपूर हे काल संध्याकाळच्या सुमारास स्विफ्ट मोटर कारने श्रीरामपूर कडे जात असताना एका मोटरसायकल स्वाराने ओव्हरटेक करतो काय?असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली व स्विफ्ट गाडीच्या समोरच्या काचेवर कशाने तरी फटका मारून त्याचे नुकसान केले.

           या प्रकरणी काल रात्री उशिराने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 345/ 2021 दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री.साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिंदे हे करीत आहेत.