शिवप्रहार न्यूज - शिवप्रहारचा "शिवदरबार"(जनता गॅरेज) उपक्रम शिवजयंतीपासून व्यापक स्वरूपात राबवणार-चंद्रशेखर आगे...

शिवप्रहार न्यूज - शिवप्रहारचा "शिवदरबार"(जनता गॅरेज) उपक्रम शिवजयंतीपासून व्यापक स्वरूपात राबवणार-चंद्रशेखर आगे...

शिवप्रहारचा "शिवदरबार"(जनता गॅरेज) उपक्रम शिवजयंतीपासून व्यापक स्वरूपात राबवणार-चंद्रशेखर आगे...

श्रीरामपूर- शिवप्रहार प्रतिष्ठानच्यावतीने श्रीरामपुरातील गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयातील प्रश्न सोडविण्यासाठी मदत व्हावी याकरिता गेल्या दोन वर्षापासून शिवदरबार (जनता गॅरेज) नावाचा उपक्रम सुरू आहे. लहान स्वरूपात सुरू असलेला हा उपक्रम यंदाच्या शिवजयंतीपासून व्यापक स्वरूपात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिवप्रहार प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष श्री.चंद्रशेखर (चंदू)आगे यांनी दिली.

       प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी सर्वसामान्य जनतेचे "श्रीरामपुरातील" सरकारी कार्यालयांमधील उदाहरणार्थ - तहसील कार्यालय ,नगरपालिका कार्यालय, महावितरण ,राशन कार्यालय ,पोलीस ठाणे ,सरकारी रुग्णालय व इतर सरकारी कार्यालये या ठिकाणी प्रलंबित असलेले प्रश्न, समस्या विनामूल्य सोडून देण्यासाठी पूर्ण सहकार्य या उपक्रमात केले जाईल. 

"शिवदरबार (जनता गॅरेज)चा उपक्रम नेमका कशासाठी = >  

       छत्रपती शिवाजी महाराज हे मोहिम /लढाईचे कार्य आटोपल्यावर सर्वप्रथम सर्वसामान्य रयतेच्या सरकारकडे आलेल्या समस्या सोडवण्याचे कार्य करायचे.आज महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू आहेत.परंतु अशी कोणतीही बिगर राजकीय संघटना शिवाजी महाराजांचा हा रयत कल्याण विचारांचा वारसा जपत नाही.तरी शिवछत्रपतींचा हा गौरवशाली वारसा संपुष्टात येऊ नये म्हणून शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने शिवदरबार (जनता गॅरेज)हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.

       वेगवेगळ्या सरकारी कार्यालयातील काही सरकारी कर्मचारी- अधिकाऱ्यांकडून अठरापगड जातीच्या सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होते त्याला आळा घालण्यासाठी हा उपक्रम महत्वाची भूमिका बजावेल.तसेच यातून शिवछत्रपतींच्या गौरवशाली वारशाचे जतन होऊन तो आपल्याला पुढच्या पिढीकडे सोपवता येईल.

 "शिवदरबार (जनता गॅरेज)चे ठिकाण -शिवप्रहार प्रतिष्ठान कार्यालय , बजरंगनगर, बेलापूर रोड, श्रीरामपूर शहर."

संपर्क क्रमांक -७२७६७६७५०१,९३७००५००६५.

"शिवहिंदुत्वाचा विचार मनामनात 

शिवहिंदुत्वाचा विचार घराघरात"

हर हर महादेव