शिवप्रहार न्यूज - 65 वर्षाच्या थेरड्याचा २ वर्षाच्या चिमुकलीवर खंडाळ्यात बलात्कार ! नवऱ्याबरोबर भांडण बायकोने दाबला मुलाचा गाळा !!

शिवप्रहार न्यूज - 65 वर्षाच्या थेरड्याचा २ वर्षाच्या चिमुकलीवर खंडाळ्यात बलात्कार ! नवऱ्याबरोबर भांडण बायकोने दाबला मुलाचा गाळा !!

65 वर्षाच्या थेरड्याचा २ वर्षाच्या चिमुकलीवर खंडाळ्यात बलात्कार ! नवऱ्याबरोबर भांडण बायकोने दाबला मुलाचा गाळा !!

 श्रीरामपूर/कोपरगाव (शिवप्रहार न्यूज)- मानवतेला काळीमा फासणारी अतिशय भयानक घटना श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा परिसरात घडली खंडाळा गावात राहणारा आरोपी भास्कर मोरे वय-65 या थेरड्याने त्याच्या घरी खेळण्यासाठी आलेल्या एका २ वर्षे वयाच्या लहान मुलीवर तिला काही कळत नाही अशा तिच्या निरागस मनाचा गैरफायदा उठवत लिंगपिसाट भास्कर मोरे यांने लहान मुलीवर भर दिवसा चारच्या सुमारास बलात्कार केला. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी थेट श्रीरामपूर शहर पोलिसांत जाऊन फिर्याद दिल्याने आरोपी भास्कर धाकू मोरे या डंगऱ्याविरुद्ध भादवि कलम 376 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा कलम ४, ८,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून एसपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तातडीने तपास चक्र फिरवत लिंगपिसाट भास्कर मोरे याला अटक केली असून पोसई देवरे हे पुढील तपास करीत आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून गावातच राहणारे इसमाने अशाप्रकारे खेळायला आलेल्या लहान मुलीवर बलात्कार केल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोणावर विश्वास ठेवावा का नाही ? अशी गंभीर अवस्था या घटनेतून समोर आली आहे.   

  दुसऱ्या घटनेत कोपरगाव तालुक्यातील कारवाडी दंडवते वस्ती येथे राहणारा कष्टकरी तरुण सुरज शंकर माळी याची बायको गायत्री सुरज माळी हीने नवऱ्याबरोबर होणाऱ्या सततच्या भांडणाला कंटाळून घरगुती कटकटी मुळे स्वतःच्या पोटचा मुलगा शिव सुरज माळी वय-साडेपाच वर्ष याचा आईनेच मारहाण करून गळा दाबून त्याचा खून केला व मृतदेह सुधाकर दंडवते यांच्या मालकीच्या विहिरीत टाकून दिला व बनाव केला मात्र हा प्रकार उघड झाला. नवरा सुरज शंकर माळी यांच्या फिर्यादीवरून आरोपी बायको गायत्री सुरज माळी हीच्याविरुद्ध भादवी कलम 302, 201 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून डीवायएसपी सातव, पोनि.जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. राक्षसी वृत्तिची आई गायत्री माळी हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने देखील कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.