शिवप्रहार न्यूज - अल्पवयीन मुलीची विक्री, मुलगी गर्भवती; श्रीरामपुरातील खळबळजनक घटना…

शिवप्रहार न्यूज -  अल्पवयीन मुलीची विक्री, मुलगी गर्भवती; श्रीरामपुरातील खळबळजनक घटना…

अल्पवयीन मुलीची विक्री, मुलगी गर्भवती; श्रीरामपुरातील खळबळजनक घटना…

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- निपाणीवडगाव परिसरात राहणाऱ्या एका १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीची श्रीरामपुरातील फातिमा  सोसायटीमधील एका कुटूंबाला विक्री केल्याचा प्रकार उघड झाला असून या प्रकरणात सदर मुलीची आई व तिचा यार नवाब लालभाई शेख सामील असून याबाबत श्रीरामपूर जिल्हा व सत्र न्यायालयात मुलीच्या वडीलांनी गुन्हा दाखल होण्यासाठी खासगी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      याबाबतची अधिक माहिती अशी की, निपाणीवडगाव परिसरात राहणाऱ्या एका कुटूंबात ही घटना घडली असून सदर कुंटूंबातील मुलीच्या आईचे परिसरात राहणाऱ्या नवाब लालभाई शेख याच्याशी अनैतिक संबंध गेल्या ९ वर्षांपासून आहे. त्यामुळे मुलीच्या वडीलांनी श्रीरामपूर न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केलेला होता. याशिवाय मुलीच्या आईकडून मुलीचा ताबा आपल्याला मिळावा, असाही अर्ज मुलीच्या वडीलांनी न्यायालयात केला होता. मुलीच्या वडीलांना २०२०-२१ रोजी सदर मुलगी ताब्यात मिळाली. परंतु मुलीची आई आणि आरोपी शेख यांनी मोठ्या शिताफिने मनमाड पोलीस स्टेशन येथे नेवून तिला ताब्यात घेतले. त्याची नोंद मनमाड पोलिसांत आहे. तेव्हापासून ही पिडीत मुलगी तिची आई आणि तिचा यार शेख यांच्या ताब्यात होती. त्यानंतर कोविडचा कालावधी आला व त्यानंतर मुलीच्या वडीलांनी पुन्हा मुलीच्या कस्टडीसाठी पाठपुरावा केला. दरम्यान, दि. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी सदर मुलगी श्रीरामपूर शहरातील एका कापड दुकानामध्ये बुरखा घालून आलेली होती. ती गर्भवती असल्याचे वडीलांना त्यांच्या एका नातेवाईक महिलेने सांगितले. 

      त्यानंतर दि. ५ फेब्रुवारी रोजी या मुलीचे वडील इंदिरानगर परिसरातून जात असताना त्यांची मुलगी गर्भवती अवस्थेत असलेली एका २५ वर्षीय इसमाच्या मोटारसायकलवर पाठीमागे बसलेली त्यांना दिसली. तेव्हा त्यांनी तिला आवाज दिला. परंतु संदर इसम गाडीवर जोरात निघून गेला. मुलीची अवस्था पाहून वडील व्यथित झाले होते. त्यानंतर या वडीलांना संशय आल्याने त्यांनी मुलीचा शोध घेतला असता आपल्या मुलीला नवाब लालाभाई शेख तसेच आपली पत्नी यांनी आर्थिक तडजोड करून श्रीरामपुरातील फातिमा सोसायटी मधील एका मुस्लिम कुटूंबास या मुलीला विकल्याचे समजले. नव्हेतर तिच्यासोबत लग्नाचा बनाव करून विवाहाचे नाटक करून लैंगिक अत्याचार करून गर्भवती केल्याचे मुलीच्या वडीलांनी फिर्यादीत म्हटले आहे. सदर खासगी फिर्यादीवरून श्रीरामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फिर्यादीची पत्नी तसेच तिच्याबरोबर राहणारा नवाब लालभाई शेख आणि पिडीत मुलीशी लग्न करणारा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर शहर पोलिसांना दिले त्यानुसार आरोपींविरोधात बलात्कार व पोक्सो कायद्यातील कलमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सदर मुलीच्या वडीलांच्या वतीने श्रीरामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात ॲड.तुषार चौदंते, ॲड.सौरभ गदीया यांनी खासगी फिर्याद दाखल केली होती.

      दरम्यान पीडित मुलीची विक्री करणारा आरोपी नवाब लालभाई शेख आणि सदर पीडित मुलीशी विवाहाचे नाटक करणारा आरोपी अजिम उर्फ अज्जू अन्वर पठाण ,वय-25 रा.फातिमा  सोसायटी श्रीरामपूर यांना पोलिसांनी अटक करून आज शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 21 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

          सहा महिन्यांपूर्वी मुल्ला कटर टोळीने काहीसा अशा प्रकारचा अत्याचार हिंदू समाजातील मुलींवर केला होता.