शिवप्रहार न्यूज-रेमडेसीवीर काळा बाजार प्रकरणातील फरार आरोपी कोविड सेंटरचा संचालक?

रेमडेसीवीर काळा बाजार प्रकरणातील फरार आरोपी कोविड सेंटरचा संचालक?
नेवासा: दोन दिवसांपूर्वी तालुक्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे वडाळा बहिरोबा (ता.नेवासे) येथील रॅकेट पोलीसांनी उध्वस्त करून चार आरोपींना जेरबंद केले होते . त्यातील फरार झालेला एक आरोपी हा नेवासा भागातील एका कोविड सेंटरचा संचालक असल्याचे उघड झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. नगरच्या LCB पथकाने रविवार (ता.९) वडाळा बहिरोबा येथील एका हॉटेलसमोर छपा घालून ०१)रामहरी घोडेचोर,०२)सागर हंडे , ०३)आनंद थोटे,०४) पंकज खरड या चौघांना रेमडेसीवीर इंजेक्शनसह अटक केली होती. त्यातील एक जण फरार झाला होता तो वडाळा बहिरोबा येथील कोविड सेंटरचा संचालक असून,त्याच्या अटकेनतर मोठे रॅकेट समोर घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हा कोवीड सेंटरचा संचालक असलेला फरार आरोपी कोवीड सेंटरच्या नावाखाली रेमडेसीवीर इंजेक्शन आणुन ,रेमडेसीवीर पेशंटला दिल्याचे कागदोपत्री दाखवुन त्याचा काळाबाजार करत असावा अशी चर्चा आहे.