शिवप्रहार न्यूज-शिवप्रहार प्रतिष्ठानच्यावतीने हजारो गोरगरीब,दीनदलित कुटुंबांना  “दिवाळी फराळ”वाटप…

Use

शिवप्रहार न्यूज-शिवप्रहार प्रतिष्ठानच्यावतीने हजारो गोरगरीब,दीनदलित कुटुंबांना   “दिवाळी फराळ”वाटप…

शिवप्रहार प्रतिष्ठानच्यावतीने हजारो गोरगरीब,दीनदलित कुटुंबांना

 “दिवाळी फराळ”वाटप…

श्रीरामपूर- उत्तर नगर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठरा पगड जातींना एक करणाऱ्या हिंदुत्वाच्या विचारांवर चालणारी संघटना “शिवप्रहार प्रतिष्ठान” च्या वतीने उत्तर नगर मधील श्रीरामपूर, नेवासा,राहाता या तालुक्यातील काही गावांमध्ये हजारो गोरगरीब,दीनदलित कुटुंबीयांच्या घरी दिवाळी सणानिमित्त “दिवाळी फराळ भेट” देण्यात येत आहे.

         श्रीरामपुर शहरातील साई विठ्ठल अनाथ आश्रम,माऊली वृद्धाश्रम शाखा एक व शाखा दोन,तसेच उत्तर नगर मधील आदिवासी वस्ती,दलित वस्ती शेतमजूर,कामगार,ऊसतोड कामगार यांच्या कुटुंबीयांना तसेच शहरातील विविध रस्त्यावर फिरणारे भटके लोक, भिकारी लोक यांनादेखील हे दिवाळी फराळाचे पाकीट वाटण्यात आले.

            “शिवप्रहार प्रतिष्ठान” या संघटनवर जातीयवादाचे आरोप करणाऱ्या नासक्या प्रवृत्तींनी हे पाहून घ्यावे की,शिवप्रहार प्रतिष्ठान ची हिंदुत्वाची विचारधारा किती व्यापक आहे.कारण हे हिंदुत्व शिवछत्रपतींचे आहे.

“दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा”

जय श्रीराम.

जय शिवराय.

 जय भिम.

 जय लहुजी.

जय एकलव्य.