शिवप्रहार न्यूज - पंधराशे किलो गो मांस पकडले; आरोपी कुरेशी अंधारात झाला फरार...

शिवप्रहार न्यूज - पंधराशे किलो गो मांस पकडले;  आरोपी कुरेशी अंधारात झाला फरार...

पंधराशे किलो गो मांस पकडले; 
आरोपी कुरेशी अंधारात झाला फरार... 

संगमनेर - राज्यात गोहत्या बंदी कायदा असतांनाही  संगमनेरात मात्र बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच असल्याचे काल पुन्हा सिद्ध झाले.संगमनोरातील जमजम कालनी येथे एका कत्तलखान्यात गोमांस विक्री होत असल्याची माहीती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला तेव्हा जाहीर अन्वर कुरेशी हा गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले मांस विक्री करण्याच्या उद्देशाने आढळुन आला. पोलिसांनी कारवाई सुरु करताच कुरेशी अंधाराचा फायदा घेवुन पसार झाला.पोलिसांनी पंचनामा करुन एकुण ०३ लाख रुपयाचे १५०० किलो  गोमांस जप्त केले. तसेच कुरेशीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला आहे.
         गोवंश हत्या बंदी कायदा राज्यात लागु असतांना संगमनेरात बेकायदेशीर कत्तलखाने कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहेत असा सवाल गो प्रेमी नागरिकांनी केले आहे.