शिवप्रहार न्यूज -श्रीरामपूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यात सर्वात कमी लसीकरण-भाजपा युवामोर्चाचा आरोप...
श्रीरामपूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यात सर्वात कमी लसीकरण-भाजपा युवामोर्चाचा आरोप...
श्रीरामपूर - उत्तर नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यापेक्षा श्रीरामपूर तालुक्याचे लसीकरणाचे प्रमाण सर्वात कमी आहे. कोरोना विरुद्ध लसीकरण अत्यंत प्रभावी आहे. म्हणून देशासह राज्यात लसीकरण सुरु झाले आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणा लसीचे सर्व जिल्ह्यात योग्य प्रकारे वाटप करत आहे असे वाटत होते. पण भाजपा युवा मोर्चाच्या काही पदाधिकार्यांनी माहिती घेतल्यावर असे लक्षात आले की,उत्तर नगरजिल्ह्यात सर्वात कमी लसीकरण हे श्रीरामपूर तालुक्यात झालेले आहे. त्यामुळे तालुक्याचे लोकप्रतिनिधी असणारे करतात तरी काय? असा सवाल भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हरकल व जिल्हा सरचिटणीस विशाल यादव यांनी विचारला आहे.
श्रीरामपूर तालुक्यामध्ये ४५ वर्षाच्यावरील लसीकरण दुसर्या डोस साठी जेष्ठ नागरीक अत्यंत त्रास सहन करुन उन्हा तान्हात उभे राहुन दुसरा डोस घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. रात्र-रात्र जागरण करुनही लसीचा दुसरा डोस मिळत नाही. परंतु बाकीच्या सर्व तालुक्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने जेष्ठ नागरीकांसाठी व्यवस्था केलेली आहे. सर्व तालुक्यांमध्ये जास्तीत जास्त लस पुरवठा येत आहे. मग श्रीरामपूर तालुक्याचे आमदार करतात काय ? एकीकडे फक्त जनतेची दिशाभुल करण्याचे काम श्रीरामपूरच्या आमदार साहेबांनी लावले आहे का?असाही सवाल त्यांनी विचारला.
श्रीरामपूर तालुक्यामधील कॉंग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते “राष्ट्रवादीच्या एका आमदार” चे गुणगाण गात आहेत. पण आपले आमदार करतात काय ? यावर कोणताही कार्यकर्ता बोलायला तयार नाही. श्रीरामपूर तालुका लसीकरणासाठी इतका मागे का ? हा ही प्रश्न कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी आपल्या आमदार साहेबांना विचारावा? श्रीरामपूर तालुका वार्यावर सोडला आहे हे दिसते केवळ निवडणूकीपुरते लोकांची कणव दाखवायची अन् नंतर उपकार केल्यासारखे दाखवायचे असे किती दिवस चालायचे आहे.
एकीकडे शहरासहीत तालुक्यातील युवकांची कोरोना पॉझिटीव्ह होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसाच मृत्युचा आकडा ही वाढलेला आहे. परंतु श्रीरामपूर तालुक्याची हक्काची लस दुसरीकडे जाती कशी ? या गोष्टीतून एक लक्षात येते की, आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांचे लक्ष नाही.
तरी लवकरात लवकर आमदार साहेबांनी जास्तीतजास्त लसी पुरवठा श्रीरामपूर तालुक्यासाठी आणावा अशी मागणी भाजपा युवा मार्चाचे जिल्हाउपाध्यक्ष रुपेश हरकल ,जिल्हा सरचिटणीस विशाल यादव, तालुकाध्यक्ष दत्ता जाधव, योगेश ओझा, जिल्हा चिटणीस अक्षय नागरे, राहुल आठवल,शहर सरचिटणीस अक्षय वर्पे व आनंद बुधेकर यांनी व भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहिर मागणी केली आहे.