शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरात 02 घटनेत 02 महिलांचे गंठण धूम स्टाईलने चोरले…

श्रीरामपूर शहरात 02 घटनेत 02 महिलांचे गंठण धूम स्टाईलने चोरले…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील संगमनेररोड वरील रॉयल एनफिल्ड बुलेट शोरूम समोरून सोनाली जोशी, राहणार- बोरावके नगर,श्रीरामपूर या ऍक्टिवा गाडीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या लाल रंगाच्या मोटरसायकल वरील दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील पंचवीस हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 157 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या घटनेत छत्रपती शिवाजी महाराज रोडवर नगरपरिषद हॉस्पिटल समोरच्या ठिकाणी हिरा चंद्रभान शिंदे, राहणार- गुलमोहर हॉटेल मागे, श्रीरामपूर या जात असताना दोन अज्ञात चोरट्यांनी काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकलवरून येऊन त्यांच्या गळ्यातील 57000 पाचशे रुपये किमतीचे सोन्याची चैन हिसकावुन धूम ठोकली.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 156 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही घटनांचा तपास श्रीरामपूर शहर पोलिसांकडून चालू आहे.