शिवप्रहार न्यूज- कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीतील आरोपी नयन तांदळे सह अन्य तीन साथीदारांना विशेष मोक्का न्यायालयाची दहा दिवसाची वाढीव पोलीस कोठडी..
कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीतील आरोपी नयन तांदळे सह अन्य तीन साथीदारांना विशेष मोक्का न्यायालयाची दहा दिवसाची वाढीव पोलीस कोठडी...
अहमदनगर- जिल्हात मालमत्ता विषयक गुन्ह्याकरिता कुप्रसिद्ध असलेल्या नयन तांदळे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. सुपा पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अक्षय चखाले रा. निगडी , पुणे यांनी Cr. No. 504/ 2020 IPC 395, 341 नुसार गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नयन तांदळे सह टोळीतील अन्य 4 सदस्यांना अटक करण्यात आली होती. नयन तांदळे टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून, हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन मा. श्री मनोज पाटील( पोलीस अधिक्षक), मा. श्री. सौरभ अग्रवाल ,मा. श्री. अजित पाटील यांनी सदर गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास Dysp संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे.
आज रोजी Dy.s.p संदीप मिटके यांनी खालील आरोपीताना
1)नयन राजेंद्र तांदळे
2) विठ्ठल भाऊराव साळवे
3) शाहुलअशोक पवार
4) अमोल छगन पोटे
मा.विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर येथे हजर केले असता मा. विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर यांनी 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आरोपीच्या वतीने ॲड. आवारे, ॲड.दांगट,ॲड. श्रीमती साबळे यांनी बाजू मांडली तर सरकारी पक्षातर्फे ॲड. श्रीमती कापसे व Dy.s.p संदीप मिटके यांनी जोरदार युक्तिवाद केला मा. न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस दहा दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.