शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात महिलेच्या घरी चोरी करणारा चोरटा पकडला...

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात महिलेच्या घरी चोरी करणारा चोरटा पकडला...

श्रीरामपुरात महिलेच्या घरी चोरी करणारा चोरटा पकडला...

 श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर ०२ भागात राहणार्या पूजा प्रकाश अहिरे यांच्या घरातून एप्रिल महिन्यामध्ये मोबाईल चोरी झाली होती. याप्रकरणी पूजा अहिरे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देखील दिली होती.

       त्या गुन्ह्याचा समांतर तपास नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर पातळीवर चालू होता. या तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने वार्ड नंबर दोन येथे राहणाऱ्या भरत सुधाकर सोनटक्के या आरोपीला अटक केली असून त्याने पूजा अहिरे यांच्या घरातून मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे. 

        स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. आरोपीने पूजा यांचा चोरलेला मोबाईल देखील पोलिसांना तपासादरम्यान काढून दिला आहे.