शिवप्रहार न्यूज- बेलापुरात जुगारी पकडले;प्रतिष्ठितांनी करून घेतली सुटका...

बेलापुरात जुगारी पकडले;प्रतिष्ठितांनी करून घेतली सुटका...
बेलापूर- बेलापूर गावात एका हॉटेलच्या मागे जुगार खेळत असलेल्या जुगारींवर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये जुगार खेळताना काही बेलापूर गावातील प्रतिष्ठित लोकही पोलिसांनी पकडले.
पोलिसांना एका खबरीने दिलेल्या टीपवरुन पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत पाच ते सात जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे.परंतु प्रतिष्ठित घरातील लोकांनी तोडपाणी व विनवणी करून स्वत:ची सुटका करून घेतली.
या प्रकराची बेलापूर गावात प्रचंड चर्चा सध्या चालू आहे.