शिवप्रहार न्यूज- अखेर ग्रामपंचायत सदस्यपतीला शिवीगाळ करणारा ग्रामसेवक बडाख याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
श्रीरामपूर-
काल तालुक्यातील कडीत बुद्रुक येथे घडलेल्या या शिवीगाळ प्रकरणाबाबत शिवप्रहार न्युज ने सविस्तर बातमी लावली होती. त्याची थोडक्यात हकीकत अशी की,कडीत बुद्रुक येथील ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी बडाख याने त्या गावच्या एका महीला ग्रामपंचायत सदस्य पतीला फोनवर दि.२६/०४/२०२१ रोजी सकाळी माहितीच्या अधिकाराबाबतची कागदपत्र मागितल्याच्या रागातुन ग्रामपंचायत सदस्य महीलेच्या पतीला आई -बहीणीवरुन अतिशय घाणघाण शिवीगाळ केली होती. तसेच श्रीरामपुरातील एका बड्या नेत्याचे नाव सांगुन दमदाटी केली होती आणि फोनवर ग्रामपंचायत सदस्य महीलेला देखील धमकी दिली होती. परंतू नंतर या मुजोर ग्रामसेवकाने यावेळी लोटांगण घालुन माफी मागितल्याने हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत काल गेला नाही.
या प्रकरणाची काल तालुकाभर चर्चा झाल्यानंतर मात्र आज या ग्रामपंचायत सदस्य पतीने गटविकास अधिकारी,श्रीरामपूर यांचेकडे शिवीगाळ करणारा ग्रामसेवक बडाख विरोघात तक्रार अर्ज करुन थेट लोणी पोलीस ठाणे गाठले.तेथे रितसर फिर्याद देवुन ग्रामसेवक बडाख याच्या विरोधात गुरनं.१४७/२०१२१ भादंवि कलम ५०९,५०७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार बाबासाहेब लबडे हे करत आहेत.