शिवप्रहार न्यूज - महाराष्ट्र राज्य सह.पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी पुन्हा काका कोयटे

शिवप्रहार न्यूज - महाराष्ट्र राज्य सह.पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी पुन्हा काका कोयटे

महाराष्ट्र राज्य सह.पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी पुन्हा काका कोयटे

कोपरगाव (शिवप्रहार न्युज)- महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी पुन्हा शिस्तप्रिय सर्वसमावेशक नेतृत्व गुण असलेले ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची निवड झाली. पुणे येथे काल मंगळवार दि. ३ जानेवारी रोजी झालेल्या नवीन संचालकांच्या बैठकीत पदाकिधाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यात एकमताने हा निर्णय घेण्यात आला. फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली.

यावेळी झालेल्या निवडीत ॲड. दीपक पटवर्धन यांची कार्याध्यक्षपदी, शशिकांत राजोबा यांची महासचिवपदी, वसंत शिंदे व डॉ. शांतीलाल सिंगी यांची उपाध्यक्षपदी, दादाराव तुपकर यांची खजिनदारपदी, सुरेश पाटील, ॲड. अंजली पाटील, चंद्रकांत वंजारी व नारायण वाजे यांची उपकार्याध्यक्षपदी, भारती मुथा, शरद जाधव, जवाहर छाबडा व भास्कर बांगर यांची सहसचिवपदी तर राजुदास जाधव यांची समन्वयकपदी निवड करण्यात आली.

उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, फेडरेशनचे संचालक राधेश्याम चांडक, धनंजय तांबेकर, रवींद्र भोसले, वासुदेव काळे, सुभाष आकरे, निलीमा बावणे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, 'भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते. 

समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमअंतर्गत संस्थेकडील ९९.६७ टक्के ठेवीदारांच्या प्रत्येकी २४ लाख रूपयांच्या ठेवींना संरक्षण देण्यात आले आहे. हाच पॅटर्न राज्यभरातील पतसंस्थांना लागू करण्याचा प्रयत्न असल्याचे कोयटे यांनी सांगितले. १९८० साली मुंबईत स्थापन झालेल्या या फेडरेशनचा कोयटे यांनी अध्यक्ष झाल्यापासून राज्यभर विस्तार केला. त्यांनी पतसंस्थेचे अनेक प्रश्न मार्गी लावले. नुकतीच अंशदान वसुलीच्या निर्णयाला स्थगिती मिळविल्याने राज्यभरातील पतसंस्थांचे २१७ कोटी रूपये वाचले आहेत. फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुरेखा लवांडे गेली १४ वर्षे जबाबदारी सांभाळत आहेत.