शिवप्रहार न्यूज- मेनरोड वरील बळवंत भुवन 81 वर्षानंतर इतिहासजमा होणार…

मेनरोड वरील बळवंत भुवन 81 वर्षानंतर इतिहासजमा होणार…
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील मेन रोडवर 1941 साली बळवंत भुवन ही इमारत बांधण्यात आली होती.स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेल्या या इमारतीचे मालक कै.निवृत्ती बळवंत गिरमे हे होत.या इमारतीचा वापर सुरुवातीला गुळाच्या व्यापारासाठी करण्यात येत होता.
नंतरच्या काळात कै.निवृत्ती गिरमे यांचे कुटुंबीय या ठिकाणी वास्तव्यास होते.नुकतेच सदरची इमारत व जागा साईश्रद्धा बिल्डर्स,श्रीरामपूर यांनी गिरमेंकडुन खरेदी केली असून या ठिकाणी भव्य व्यापारी संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळते.