शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील अल्पवयीन मुलीचे धर्मांतर-अत्याचार प्रकरण काळीमा फासणारी घटना;गुन्हेगारांना सोडणार नाही-ना राधाकृष्ण विखे पाटील…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील अल्पवयीन मुलीचे धर्मांतर-अत्याचार प्रकरण काळीमा फासणारी घटना;गुन्हेगारांना सोडणार नाही-ना राधाकृष्ण विखे पाटील…

श्रीरामपुरातील अल्पवयीन मुलीचे धर्मांतर-अत्याचार प्रकरण काळीमा फासणारी घटना;गुन्हेगारांना सोडणार नाही-ना राधाकृष्ण विखे पाटील…

श्रीरामपूर/ प्रतिनिधी -आज रविवारी सायंकाळी श्रीरामपूर शहरात वार्ड नंबर सात मधील उत्सव मंगल कार्यालयात राज्याचे महसूल व दुग्धविकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा श्रीरामपूर शहर व तालुक्यातील जनतेच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.

     या कार्यक्रमात बोलताना ना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की श्रीरामपुरातील बळजबरीचे धर्मांतर व सोळा वर्षाची मुलगी बाळाला जन्म देते ही घटना फार गंभीर घटना असून ती समाजाला काळीमा फासणारी आहे.या विरोधात श्रीरामपुरातील तरुणांनी पुढाकार घ्यावा असे काही प्रकरण असतील तर मला एसेमेस करा तुमचे नाव गुप्त ठेवु मात्र अशा गुन्हेगारांना पोलीस प्रशासनामार्फत कठोर कारवाई करून धडा शिकवू असा इशारा दिला.पुढे बोलताना ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर ,डीवायएसपी संदीप मिटके यांनी या अत्याचार धर्मांतर प्रकरणी गुन्हेगारांना अटक करून व अनेक प्रकार उघड करून कौतुकास्पद कामगिरी केली.पोलिसांच्या तपासाबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की शिर्डीतही श्रीरामपूरचे काही गुन्हेगार व्हाइटनर पिणारे आहेत असे मला काल बैठकीत समजले हे तीर्थक्षेत्र गुन्हेगारांना पोसणारे नाही.श्रीरामपूरतही गुन्हेगार टोळ्यांना पोसणार नाही.एका महिन्यात या गुन्हेगार टोळ्यांवर कठोर कारवाई झालेली दिसेल.याबाबत एसपी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

        खंडकरी व आकारिपडी त जमिनीचा प्रश्न सोडू व बेकायदेशीर जमीन वाटपाची चौकशी करू असे त्यांनी बजावले.

       प्रास्ताविकात दीपक पटारे तसेच शरद नवले ,मारुती बिंगले व माजी आमदार चंद्रशेखर कदम पाटील यांनी श्रीरामपूर जिल्हा करा अशी मागणी केली मात्र जिल्हा प्रश्नावर विखे पाटील यांनी काही भाष्य केले नाही.मात्र मागील महसूलच्या कारभारावर त्यांनी टीका केली तसेच लोकप्रतिनिधी व पालिकेच्या खड्ड्यावर ,भ्रष्ट पोलिस अधिकारी निलंबित झाल्याचा उल्लेख करत त्यांनी चुकीचे काम करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला सोडले जाणार नाही असा इशारा विखे पाटील यांनी दिला.

       आजच्या कार्यक्रमाला भाजपा श्रीरामपूर शहर व तालुक्यातील विखे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.