शिवप्रहार न्यूज- कुख्यात सागर भांड टोळीविरुद्ध विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल;Dysp संदीप मिटके यांनी तपासादरम्यान गोळा केले सबळ पुरावे…
कुख्यात सागर भांड टोळीविरुद्ध विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल;Dysp संदीप मिटके यांनी तपासादरम्यान गोळा केले सबळ पुरावे…
(नगर-प्रतिनिधी): जिल्ह्यात मालमत्ता विषयक गुन्ह्याकरिता कुख्यात असलेल्या सागर भांड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली होती. राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी मयूर दिलीप देवकर यांनी गु. र. नं 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे नुसार गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्हा कुख्यात सागर भांड टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सागर भांड सह टोळीतील अन्य पाच सदस्यांना अटक करण्यात आली होती. सागर भांड टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे टोळीप्रमुख सागर भांड चे वडील पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत होते.
तरी देखील सदरक्षणाय खलनिग्रहणाय या उक्तीप्रमाणे गुन्हेगारास कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न अहमदनगर पोलीस यांचेकडून करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास Dysp संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला होता. सागर भांड विरुद्ध दरोडा, अपहरण, फसवणूक, अवैध शस्त्र वापर असे तब्बल 27 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा फौजदारी कट रचून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने 120( ब), व गुन्हा करून पुरावे नष्ट केला म्हणून 201 भा.द.वि.कलमाप्रमाणे तपासी अधिकारी यांचेकडून या गुन्ह्यास वाढीव कलमे लावण्यात आली.
सदर टोळीवर या पूर्वी संघटितपणे केलेले खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1) सागर भांड (टोळी प्रमुख)
1) राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट 4/25
2) राहुरी 690/ 21 IPC 397,395,392,504,506,34 सह आर्म ॲक्ट 4/25
3) राहुरी 686/21 IPC IPC 397,395,392,504,506,34 सह आर्म ॲक्ट 4/25
4) राहुरी 652/21 IPC 395,392,34 सह आर्म ॲक्ट 4/25 5) राहुरी 632/21 ipc 392, 341.
6) एम आय. डी सी. 12/16 ipc 392 ,
7) एम आय. डी सी.52/14 ipc 394,439,34
8) एम आय. डी सी.181/14 ipc 399,402.
9) एम आय. डी सी.247/14.ipc 363,366
10) एम आय. डी सी.29/15 ipc 394,
11) एम आय. डी सी.32/15 ipc 394.
12) एम आय. डी सी.242/15 ipc 392
13) एम आय. डी सी.28/16 ipc 399,402
14) एम आय. डी सी.237/17 ipc 399,402
15) एम आय. डी सी.272/18 ipc 402
16) एम आय. डी सी.425/18 ipc 394,34
17) राहुरी 282/ 16 IPC 394.
18) राहुरी 873/ 19 IPC 392,341,34.
19) राहुरी 330/ 19 IPC 394,34.
20) राहुरी 952/ 19 IPC 399,402
21) शिर्डी 165/17 IPC 392,34
22) कोतवाली 461/17 IPC
399,402
23)कोतवाली 12/17 IPC 379.
24) भिंगार कॅम्प 191/18 IPC
420,467.
25) शिक्रापूर जि. पुणे 86/19 IPC 394,401.
26) संगमनेर शहर 121/15 IPC 379,34
27) सुपा 28/17 IPC 399.
2) *निलेश संजय शिंदे* (टोळी सदस्य)
1) राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट 4/25
2) तोफखाना 26/21 IPC 392,395,427,34
3) एम आय. डी सी. 12/21 IPC 392,395,427,34
4) राहुरी 690/ 21 IPC 397,395,392,504,506,34 सह
आर्म ॲक्ट 4/25
5) राहुरी 686/21 IPC IPC 397,395,392,504,506,34
सह आर्म ॲक्ट 4/25
6) राहुरी 652/21 IPC 395,392,34 सह आर्म ॲक्ट 4/25
7)राहुरी 632/21 ipc 392, 341.
3) *गणेश रोहिदास माळी* (टोळी सदस्य)
1)राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट
4/25
2) राहुरी 690/ 21 IPC 397,395,392,504,506,34
आर्म ॲक्ट 4/25
3) राहुरी 686/21 IPC IPC 397,395,392,504,506,34
आर्म ॲक्ट 4/25
4) राहुरी 652/21 IPC 395,392,34 सह आर्म ॲक्ट 4/25
5) राहुरी 632/21 ipc 392, 341.
4) *रमेश संजय शिंदे* (टोळीसदस्य)
1) राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट 4/25
2)राहुरी690/21IPC397,395,392
,504,506,34 सह आर्म ॲक्ट 4/25
3) राहुरी 686/21 IPC IPC 397,395,392,504,506,34 सह आर्म ॲक्ट 4/25
4) राहुरी 652/21 IPC 395,392,34 सह आर्म ॲक्ट 4/25
5)राहुरी 632/21 ipc 392, 341.
*5)नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी*( टोळी सदस्य)
1) राहुरी 711/21 IPC 395, 397, 341,506 आर्म ॲक्ट 4/25
2) राहुरी 690/21 IPC 397, 395, 392,504,506,34 आर्म ॲक्ट 4/25
3)राहुरी 686/21 IPC 397, 395, 392, 504,506,34 आर्म ॲक्ट 4/25
4)राहुरी 652/21 IPC 395,392,34 आर्म ॲक्ट 4/25
5)राहुरी 632/21 ipc 392, 341.
6) *रवी पोपट लोंढे* (टोळी सदस्य) 1)राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट 4/25
2)राहुरी 690/ 21 IPC 397,395,392,504,506,34 आर्म ॲक्ट 4/25
3)एम आय. डी सी.29/15 ipc 394.
सदर गुन्ह्यात कुख्यात सागर भांड टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999चे कलम 3(1) (ii) ,3(2), व 3(4)(मोक्का) अन्वये मा अपर पोलीस महासंचालक सो (का व सू) महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक No.DGP/23/54/MCOCA/18/2022 दिनांक 07/03/2022 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मिळाली. Dysp संदीप मिटके यांनी सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र विशेष मोका न्यायालयात दाखल केले.