शिवप्रहार न्यूज -मराठा आरक्षण कोर्टात टिकवू न शकणाऱ्या सरकारला सरकारला श्रीरामपुरातुन साडी चोळी भेट
मराठा आरक्षण कोर्टात टिकवू न शकणाऱ्या सरकारला सरकारला श्रीरामपुरातुन साडी चोळी भेट ...
श्रीरामपूर- गेल्या ३५ वर्षांचा प्रदीर्घ लढा, लाखोंच्या संख्येने शांततेत निघालेले मूक मोर्चे, या नंतर तत्कालीन युती सरकारने मराठा समाजास आरक्षण जाहीर केले. मात्र आरक्षणा विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिके विरोधात महाविकास आघाडी सरकारला हे आरक्षण टिकविता आले नाही. त्याच बरोबर केंद्र सरकारने, राज्य सरकारचे अधिकार काढुन घेतल्यामुळे देखील सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचे आरक्षण टिकले नाही. म्हणुन सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्याचा निर्णय दिला. न्यायलायाच्या या निर्णयानंत अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने केंद्र व राज्य सरकारला प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत साडी,चोळी व बंगडीचा आहेर देण्यात आला आहे. यावेळी छावाचे प्रदेश संघटक सुभाष जंगले, जिल्हा अध्यक्ष नितीन पटारे , तालुकाअध्यक्ष निलेश बनकर, शेतकरी आघाडीचे विजय सलालकर,शहर अध्यक्ष शरद बोबले,शाखा अध्यक्ष दत्ता कसबे ,संघटक अक्षय पटारे ,बाळासाहेब उंडे,अशोक अभंग ,दौलत गायकवाड,किरण गुंजाळ ,गणेश धुमाळ, मच्छिंद्र कोकणे आदी उपस्थित होते.