शिवप्रहार न्यूज- छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य चित्रपट काढू; बीजी शेखर पाटील इतिहासकारच -छत्रपती खा.संभाजी महाराजांचे गौरोवोद्गार !          

शिवप्रहार न्यूज- छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य चित्रपट काढू; बीजी शेखर पाटील इतिहासकारच -छत्रपती खा.संभाजी महाराजांचे गौरोवोद्गार !          

छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य चित्रपट काढू; बीजी शेखर पाटील इतिहासकारच -छत्रपती खा.संभाजी महाराजांचे गौरोवोद्गार !          

नगर ( शिवप्रहार न्युज ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर भव्य -दिव्य चित्रपट काढू तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील हे इतिहासकार असल्याचे गौरोवोद्गार माजी खा व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज यांनी काढले. 

       काल ऐतिहासिक नगर शहरात डीजी बीजी शेखर पाटील यांनी लिहीलेल्या शुर सरसेनापती संताजी या पुस्तकाचे प्रकाशन छत्रपती संभाजी महाराज ,जेष्ठ समाज सेवक पद्मभुषण आण्णा हजारे यांचे हस्ते झाले .यावेळी हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार ,साहित्यिक श्रीपाद सबनीस, जिल्हाधिकारी राजेन्द्र भोसले ,केन्द्र सरकारचे अधिकारी अशोक ठोंबरे, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, स्वाती भोर ,उद्योजक फिरोदीया ,विद्युल्लता शेखर पाटील पुण्याचे नवले पाटील, माजी पोलीस अधिकारी जाधव ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

     यावेळी बोलतांना छत्रपती शिवाजी महाराज घराण्याचे वंशज मा . खा . संभाजी महाराज यांनी स्वतःहा शिवाजी महाराजांवर भव्य दिव्य चित्रपट काढण्याची भुमिका जाहिर केल्याने उपस्थितांनी त्याला भरभरून टाळ्यांच्या गजरात दाद दिली.संभाजी महाराज पुढे म्हणाले की,भोसले घराणे व घोरपडे घराणे यांच्या राशी एक आहेत.छत्रपती संभाजी महाराजांची क्रुर हत्या औरजेबाने केली त्याचा बदाला म्हणून शुर सरसेनापती संताजी घोरपडे यांनी औरंगजेबच्या छावणीवर सैन्यासह हल्ला चढवला व शमियान्याचे सोन्याचे कळस कापून आणले.७ वर्षऔरंगजेब या बलाढ्य शक्तीशी लढा दिला . वरिष्ठ पोलीस अधिकारी असतांनाही रात्री रात्री वेळ काढून बीजी शेखर पाटील यांनी ५ वर्ष इतिहास ग्रथांचा अभ्यास करून साडेआठ हजार किलोमिटर प्रवास करून ऐतिहासिक स्थळांना भेटी देवून शुर सरसेनापती संताजी हे पुस्तक लिहिले. तेव्हा बीजी शेखर पाटील हे इतिहासकार असून यातील छोट्या -छोट्या घटनांचा अभ्यास होणे आवश्यक आहे असे सांगून संभाजी महाराज म्हणाले औरगजेब पराक्रमी होता.मात्र तो तेवढाच क्रुर होता औरंगजेबला जेवढा व्देष शिवाजी महाराजांबद्दल होता तेवढाच व्देष संताजीबद्दल होता . औरंगजेबचे मुले नातु सरदार यांना मावळ्यांनी जेरीस आणले होते .       

       झाशीच्या राणी मोठ्या असतील परंतू त्याहीपेक्षा ताराराणी मोठ्या लढवैय्या होत्या.त्यांनी ८ वर्षं क्रुर औरंगजेब बरोबर लढा दिला.त्याला स्वराज्य जिंकता आले नाही.तो याच मातीत गाडला गेला . मी स्वतः गड किल्ले संवर्धनाचे काम हाती घेतले असून त्यासाठी प्रमुख उद्योगपतींची भेट घेवून आर्थिक उपलब्धतेचे काम सुरु आहे .सरकार पैसे केव्हा देईल माहीत नाही परंतु मी १५ किल्ल्याचे संवंर्धनाचे काम लवकरच सुरु करणार आहे.त्यासाठी राज्यभर दौरे सुरु आहेत . 

      शेखर पाटील यांचे हे पुस्तक स्वामी निष्ठता, लढवैय्यापणा,देशप्रेम,आपार मेहनत शिकवते असेही छत्रपती संभाजी महाराज म्हणाले त्यांनी अनेक इतिहासाचे किस्से सांगीतले . अण्णा हजारेंच्या आंदोलनाचे कौतुक करत आपणास ४ दिवसाचे उपोषणाने त्रास झाला आपण उपोषण कसे करता ते मला शिकवा असे म्हणताच सभागृहात एकच हशा झाला . 

     यावेळी बोलतांना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बीजी शेखर साहेबांच्या अभ्यासू वृत्ती व मेहनतीचे कौतुक करत पुस्तक देशप्रेमाची प्रेरणा देणारे आहे.मी शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवाच करणार असे स्पष्ट केले . साहित्यिक श्रीपाद सबनीस यांनी इतिहासाचे दाखले देत शुर सेनापती संताजी हे पुस्तक बीजे शेखर पाटील यांनी फार मेहनतीने वाचकांसमोर आणले असे सांगीतले . 

       आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचेजलनीती,गडनीती ,राजनीती ,कृषीनीती यासंबंधी रायगडावर मला संभाजी महाराजांमुळे बोलण्याची संधी मिळाली हे मी माझे सर्वोच्च भाग्य समोजतो असे सांगून एक मोठे पोलीस अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासवर पुस्तक लिहितात ही खरोखरच अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले . 

       केन्द्र सरकारचे अधिकारी अशोक ठोंबरे यांनी बीजी शेखर पाटील यांचे इतिहासाचे अभ्यासाबद्दल कौतुक करत छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातला महाराष्ट्रीय व्यक्ती पंत्रप्रधान व्हावा अशी भावना व्यक्त करत म्हणाले की आम्ही लंडनला गेलो होतो तेव्हा राणी एलीझाबेत यांनी मला हिन्दुस्तानातून कठुन आलात असे विचारले तेव्हा मी म्हणालो, महाराष्ट्रातून तेव्हा राणी एलीझाबेत उठून उभ्या राहिल्या व म्हणाल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे येथून का ? तेव्हा मला मोठा अभिमान व गौरव वाटला.राणी म्हणाल्या आमच्याकडे शिवाजी महाराजांसारखे महापुरुष असते तर आम्ही ब्रिटीशांनी एक हजार वर्षे राज्य केले असते अशी आठवण अधिकारी ठोबरे यांनी सांगीतली.

      अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ आग्रवाल यांनी जिल्हा पोलीस दलाचे वतीने पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास व बीजी शेखर पाटील यांना शुभेच्छा दिल्या . 

         यावेळी पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांनी पुस्तक लिहिण्याविषयी सांगीतले की,छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरीवर जन्म झाला माझा जन्म सुद्धा पवित्र शिवनेरीच्या भुमितच झाला. पुस्तक लिहिण्यासाठी शेकडो ग्रंथ वाचले ,हजारो कीलोमिटर प्रवास केला ,ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. शुर सरसेनापती संताजी घोरपडे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रुर हत्येचा कसा प्रतिशोध घेतला औरंगजेबच्या मोठ्या सैन्यशक्ती ला शुर मावळ्यांनी कसे जेरीस आणले याचे अनेक किस्से सांगीतले . हे पुस्तक प्रकाशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना भेटलो त्यांनी हे पुस्तक वाचले .विविध विभागांनी व गुप्तचर यंत्रणांनी पुस्तक वाचले व प्रकाशनाला सरकारने परवानगी दिली .पत्नी मुलांनी चांगली साथ दिली . नगरकरांनीही प्रतिसाद दिला आणि आज हे ऐतिहासिक पुस्तक छत्रपती संभाजी महाराज,जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ,पोपटराव पवार ,सबनीस या मान्यवरांचे उपस्थितीत प्रकाशित झाले . 

       यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेन्द्र भोसले यांनी नगरचा इतिहास सांगत जिल्हा प्रशासनाचे वतीने पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांचे पुस्तक प्रकाशनाला शुभेच्छा दिल्या . सौ विद्युतलता शेखर पाटील यांनी पती बीजे शेखर पाटील हे रात्र -रात्र जागून कसे मेहनतीने साहेबांनी पुस्तके लिहिले त्याचे अनुभव सांगुन उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

        कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते . पाहुण्यांचा पगडी घालुन सन्मान करण्यात आला तर “शुर सेनापती संताजी”या पुस्तकाचे फुलांनी सजविलेल्या पालखीतून आणुन प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात व उत्साहात पार पडला .