शिवप्रहार न्यूज - शिवछत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मुजोर छिंदम विरोधात चार्जशीट दाखल...

शिवप्रहार न्यूज - शिवछत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मुजोर छिंदम विरोधात चार्जशीट दाखल...

शिवछत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मुजोर छिंदम विरोधात चार्जशीट दाखल...

नगर - युगप्रवर्तक,युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला माजी उपमहापौर श्रीपाद शंकर छिंदम, वय 35 वर्ष, याच्या विरोधात न्यायालयात साठ पानांचे चार्जशीट दाखल करण्यात आले आहे.

         तोफखाना पोलीस ठाण्याचे एपीआय किरण सुरसे यांनी हे चार्जशीट दाखल केले.यामध्ये पोलिसांनी ऑडिओ क्लिप मधील आवाज आणि छिंदम याच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते त्याचा अहवाल देखील पुरावा म्हणून जोडलेला आहे.

         महानगरपालिकेतील बांधकाम विभागाच्या एका कर्मचाऱ्याला दूरध्वनीवरून बोलताना छिंदम याने शिवछत्रपती बद्दल आक्षेपार्ह उदगार काढले होते. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी व हिंदू बांधवांनी त्याचा कठोर निषेध केला होता.