शिवप्रहार न्युज - धक्कादायक ! मोबाईलवर ओळख करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ! आरोपीला अटक ! 

शिवप्रहार न्युज - धक्कादायक ! मोबाईलवर ओळख करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ! आरोपीला अटक ! 

धक्कादायक ! मोबाईलवर ओळख करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ! आरोपीला अटक ! 

राहुरी ( शिवप्रहार न्युज ) -एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी मोबाईलवर संपर्क करून ओळख करून तिला बदनामीची धमकी देवून तिच्यावर नराधम आरोपी अजमोद्दीन महंमद शेख, वय २८ वर्षे ,याने वेळोवेळी बलात्कार केला.कोणाला काही सांगीतले तर तुझी बदनामी करील अशी आरोपी शेखने अल्पवयीन मुलीला धमकी दिली . यातून पीडीत अल्पवयीन मुलगी प्रसुती झाली.तेव्हा तिने घरच्यांना हा प्रकार सांगीतला. 

     नातेवाईकांनी या धक्कादायक प्रकारातून सावरत थेट पोलीसात तक्रार दिली.त्यावरून आरोपी अजमोद्दीन महंमद शेख याच्या विरुद्ध बलात्कार व पोस्को कायदा (बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा)कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास करत आरोपी अजमोद्दीन शेख रा . कात्रड ता . राहुरी याला अटक केली.

     डीवायएसपी संदिप मिटके ,पो. निरिक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली.पुढील तपास पोसई खोंडे हे करीत आहे . या घटनेने राहुरी तालुक्यात पालकवर्गात खळबळ उडाली आहे . मुलगी अल्पवयीन तर आरोपी सज्ञान आहे समाजात मुलीं किती असुरक्षीत व अन्यायपीडीत आहेत त्यांच्या अज्ञानपनाचा कसा गैर फायदा उठवला जातो हे भयानक ,धक्कादायक वास्तव या घटनेतुन समोर आले आहे .