शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरातील माल धक्क्यावरून ट्रक चोरला

शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरातील माल धक्क्यावरून ट्रक चोरला

श्रीरामपूरातील माल धक्क्यावरून ट्रक चोरला

श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- शहरातील रेल्वे स्टेशन वरील माल धक्क्यावरून 12 लाखाचा एमएच 06 के 4349 हा टाटा कंपनीचा मालवाहू ट्रक चोरून नेण्याची घटना घडली आहे. दि.4 डिसेंबर रोजी 9 वा. ते काल दि.5 डिसेंबर रोजी सकाळी 7 च्या दरम्यान हा ट्रक चोरुन नेला आहे. 

  याप्रकरणी दिलीप दत्तात्रय काळे धंदा-ड्रायव्हर रा-भामाठाण, ता.श्रीरामपूर यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोनि. हर्षवर्धन गवळी, सपोनी.पाटील यांनी भेट दिली. याप्रकरणी पुढील तपास पोना.पंडित हे करीत आहेत.