शिवप्रहार न्यूज -इंदोरीकर महाराजांविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन वाले उच्चन्यायालयात.....
इंदोरीकर महाराजांविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन वाले उच्चन्यायालयात.....
संभाजीनगर
आपल्या किर्तन कार्यक्रमात पुत्ररत्न प्राप्तीसंदर्भात जाहीरपणे विधान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायाल्याच्या औं.बाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील यांनी गुरुवारी इंदोरीकर महाराजांसह संगमनेर तालुका वैदकीय अधिकरी व राज्य शासनास नोटीस बजवण्याचे आदेश दिले आहेत
अंधश्रद्धा निर्मुलन समितीने खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेनुसार इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनातून पुत्ररत्न प्राप्तीच्या संदर्भाने जाहीरपणे विधान केले होते. त्यासंदर्भातील तक्रार अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पादाधिकारी संगमनेर येथील ॲड.रंजना पगार - गवांदे यांनी नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली. जिल्हा शल्यचिकित्सकांनी ही तक्रार संगमनेर तालुका वैद्यकिय अधिकाऱ्याकडे पाठवली. तालुका वैदकीय अधिकार्यांनी दिलेल्या तक्रारीवरून स्त्रीभ्रूण हत्या प्रतीबंधक कायद्यान्वये (पिसीपीएनडी) संगमनेर न्यायालयात खटला चालवण्यात आला. याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना न्यायालयाने समन्स बाजावले. त्याविरोधात त्यांनी नगर जिल्हा न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला. तो अर्ज जिल्हा न्यायालयाने मंजूर करत प्रथम वर्ग न्यायालयाचा आदेश रद्द केला.
त्याला औरंगाबाद खंडपीठात ऑड.रंजना पगार-गवांदे यांनी ॲड.जितेंद्र पाटील व ॲड.नेहा कांबळे यांच्यामार्फत आव्हान दिले. याप्रकरणात सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील डी.आर.काळे यांनी काम पहिले आहे.याप्रकरणाची खंडपीठातील पुढील सुनावणी २९ जुन रोजी ठेवण्यात आली आहे. . :