शिवप्रहार न्यूज -टाकळीभान मध्ये मंदिरातील देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू...

शिवप्रहार न्यूज -टाकळीभान मध्ये मंदिरातील देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू...

टाकळीभान मध्ये मंदिरातील देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू...

टाकळीभान -श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील श्री महादेव मंदिरामध्ये असलेल्या सप्तशृंगी मातेच्या मूर्तीची विटंबना करून,मंदिरातील वस्तूंची नासधूस केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली होती. या घटनेनंतर टाकळीभान मधील हिंदुत्ववादी तरुणांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. साळवे यांना सप्तशृंगी मातेच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या व मंदिरातील वस्तूंची नासधूस करणाऱ्या आरोपीचा लवकरात लवकर शोध लावावा व त्याच्यावर अतिशय कडक कारवाई करावी यासाठी तक्रार अर्ज दिला होता.या अर्जावर शिवाजी जाधव, राजेंद्र चव्हाण, गोरख खूरुद ,सचिन नागले, सनी जाधव,मनोज पवार,रतिलाल राजळे,पंकज जाधव, बंटी गलांडे, सुरेश कुदळ,योगेश पठारे इत्यादी टाकळीभान येथील युवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

          आज सकाळी ११ वाजता या घटनेच्या संदर्भात “शिवप्रहार न्युज” ने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.साळवे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,पोलीस पोलिसांना या घटनेबाबत तक्रार अर्ज प्राप्त झालेला असून पोलीस सप्तशृंगी मातेच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीचा कसून शोध घेत आहेत. त्याचा शोध लागल्यानंतर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक श्री.साळवे यांनी यावेळी दिले.

        तरी या घटनेच्या मागे गावातील एक दारू पिणारा “पेताड गट” असल्याची चर्चा टाकळीभान पंचक्रोशी मध्ये जोरदारपणे चालू आहे.