शिवप्रहार न्यूज - नगर,श्रीरामपूर परिसरात ढगफुटी सदृश पावसाचे थैमान,झाडं पडले,राहुरी फॅक्टरीसह अनेक रस्ते पाण्याखाली…
नगर,श्रीरामपूर परिसरात ढगफुटी सदृश पावसाचे थैमान,झाडं पडले,राहुरी फॅक्टरीसह अनेक रस्ते पाण्याखाली…
श्रीरामपूर -नगर जिल्ह्यात काल रात्रीपासुन ढगफुटी सदृश पावसाने थैमान घातले असून श्रीरामपूर,राहुरी,शिर्डी भागातही अतिवृष्टी झाली आहे.या पावसामुळे श्रीरामपूर ते राहुरी फॅक्टरी रस्त्यावर झाडे पडले असून नरसाळी येथील ओढा तुडुंब भरून वाहत असल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
तसेच श्रीरामपूर -कोपरगाव हा पुणतांबा मार्गे असलेला रस्ता देखील ओढ्यात पाणी साचल्यामुळे बंद झाले असल्याचे समजते.शिर्डी भागात राहत्याजवळ पावसामुळे नगर -मनमाड रस्ता वाहतुकीसाठी ठप्प झाला असून त्या परिसरात देखील ढगफुटी सदृश पावसामुळे नाले ,ओढे तुडुंब भरून वाहत आहे.
जिल्हाभर या पावसाने थैमान घातल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागात वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे.हा पाऊस थांबल्यावर सर्वसामान्यांचे जीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाला आता मोठी कसरत करावी लागणार आहे.