शिवप्रहार न्यूज-बेलापूरचे जागृत देवस्थान श्रीशनिदेव यात्रोत्सवास सुरूवात; दुपारी भव्य मिरवणूक…
बेलापूरचे जागृत देवस्थान श्रीशनिदेव यात्रोत्सवास सुरूवात; दुपारी भव्य मिरवणूक…
श्रीरामपूर- बेलापुर पंचक्रोशीचे जागृत देवस्थान श्रीशनिदेवाचा यात्रोत्सव आज उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. अशी माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष रवींद्र खटोड व उपाध्यक्ष भूषणकुमार चंगेडिया यांनी दिली.
यात्रेनिमित्त सोमवारी पहाटे श्रीरामपूर विभागाचे पोलिस उप अधीक्षक संदीप मिटके व पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले दाम्पत्यांच्या हस्ते श्रीशनिदेवाला विधिवत अभिषेक करण्यात आला. आज दु.४ वाजता गावातून श्रीशनिदेवाच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. उद्या (मंगळवारी) सायंकाळी ७ वाजता आझाद मैदानावर बाल कीर्तनकार ह. भ. प. कृष्णा महाराज शिरसाठ बेलापूरकर यांचे हरिकीर्तन होणार आहे. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. करमणुकीसह खेळणी, पुजा, प्रसाद व खाद्य पदार्थांची दुकाने थाटण्यात आली आहे. पंचक्रोशीतील भाविक, भक्त व नागरिक यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमात सहभागी होत आहे. यात्रोत्सव यशस्विततेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन यात्रा समितीचे अध्यक्ष रवींद्र खटोड, उपाध्यक्ष भूषणकुमार चंगेडिया, सचिव विलास मेहेत्रे, खजिनदार रामनाथ शिंदे, सदस्य माजी सरपंच भरत साळुंके, सोसायटीचे माजी चेअरमन अनिल नाईक, प्रसाद खरात, अशोक गवते, दादासाहेब साठे, गणेश मगर, सतीश सोनवणे, सुभाष मोहिते, रत्नेश कटारिया, हेमंत बंगाळ, भाऊसाहेब तेलोरे, विजय कुऱ्हे, आदित्य कोळसे, किरण भांड, विजय शेलार, पप्पू पोळ, योगेश पवार, आनंद दायमा, रवी कडू, सागर वर्मा, आयजुभाई शेख, योगेश नाईक, राजन सोनवणे, मंगेश मेहेत्रे, ज्ञानेश्वर कुलथे, सचिन कडेकर, रमेश कुटे, रिचा अमोलिक, ऋषिकेश खरात, तुषार सैंदर यांनी केले आहे.