शिवप्रहार न्यूज -एकीकडे कोरोना पेशंटला ॲाक्सीजन बेड मिळवण्यासाठी होताहेत हालच हाल; तर दुसरीकडे गॅस वेल्डींग वाल्याच्या भरेल ॲाक्सीजन सिलेंडरचा चोरट्यांनी केला गोल माल ...
एकीकडे कोरोना पेशंटला ॲाक्सीजन बेड मिळवण्यासाठी होताहेत हालच हाल;
तर दुसरीकडे गॅस वेल्डींग वाल्याच्या भरेल ॲाक्सीजन सिलेंडरचा चोरट्यांनी केला गोल माल ...
नगर -जिल्ह्यात एकीकडे कोरोना पेशंटला ॲाक्सीजन बेड मिळवायला नातेवाईकांचे प्रचंड हाल होत असतांना दुसरीकडे नगर शहरात ॲाक्सीजन चा भरलेला सिलेंडर चोरीला गेल्याची विचित्र घटना घडली आहे. शहरातील डॅान बास्को रोड वरील अल्ताब असलम शेख या इसमाच्या ए वन गॅस वेल्डींग गॅरेज मधुन सुमारे १०,०००₹ किंमतीचा ॲाक्सीजनने भरलेला सिलेंडर अज्ञात चोरट्याने चोरुन पोबरा केला आहे.याबाबत काल दि.२२/०४/२०२१ रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात गुरनं.३०८/२०२१ कलम ४६१,३८० भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तोफखाना पोलीस चोरीस गेलेल्या ॲाक्सीजन सिलेंडरचा व अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहे.