शिवप्रहार न्यूज- अनुराधाताईंचा हरवलेला दागिना दोन तरुणींनी केला परत;नगराध्यक्षांकडून कौतुकाची थाप…

अनुराधाताईंचा हरवलेला दागिना दोन तरुणींनी केला परत;नगराध्यक्षांकडून कौतुकाची थाप…
श्रीरामपूर -श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या कानातील मौल्यवान दागिना एका कार्यक्रमात हरवला होता.तो दोन तरुणींनी परत केल्याने नगराध्यक्षांनी या दोन तरुणींचे कौतुक करून त्यांच्या प्रामाणिकपणाला दाद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,श्रीरामपूर शहरातील मेनरोडवर असणाऱ्या साई सुपर मार्केट मधील संत नागेबाबा पतसंस्थेच्या कॅलेंडर प्रकाशन सोहळ्यास नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांच्या कानातला मौल्यवान दागिना हरवला होता.परंतु काही वेळातच कु.स्वप्नाली पिसोळकर व कु.किरण जाधव या दोन तरुणींनी त्यांना सापडलेला नगराध्यक्षांच्या कानातला मौल्यवान दागिना नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना परत केला.
या दोन तरुणींच्या प्रामाणिकपणामुळे नगराध्यक्षांनी त्यांना त्यांच्या नगरपालिकेतील दालनात बोलावून या दोन्ही तरुणींचे त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केले आणि त्यांचे आभार व्यक्त केले.