शिवप्रहार न्यूज- जेवण लवकर बनवले नाही म्हणुन श्रीरामपुरातील कूकला भट्टीवर पेटविले…

शिवप्रहार न्यूज- जेवण लवकर बनवले नाही म्हणुन श्रीरामपुरातील कूकला भट्टीवर पेटविले…

जेवण लवकर बनवले नाही म्हणुन श्रीरामपुरातील कूकला भट्टीवर पेटविले…

श्रीरामपूर- तालुक्यातील भेर्डापूर गावात तोरणा हॉटेल असून त्या हॉटेलमध्ये कूक म्हणून मोहनसिंग हारकसिंग सोनार, वय ४०, रा. कर्मचारी वसाहत एमआयडीसी ऑफिस, श्रीरामपूर शहर हा कुक हॉटेल तोरणामधील किचनरूममध्ये गॅसच्या भट्टीजवळ जेवणाची ऑर्डर दिल्याप्रमाणे जेवण तयार करत असताना तेथे आरोपी महेश जगताप, रा.भेर्डापूर हा स्वयंपाक खोलीत आला व मोहनसिंग सोनार या स्वयंपाक्यास म्हणाला की, तुला लवकर जेवणाची ऑर्डर लवकर मारता येत नाही का, असे म्हणून पाठीवर जोरात हाताने थाप मारून चालू गॅसभट्टीवर ढकलून दिले. त्यामुळे स्वयंपाकी मोहनसिंग सोनार यांचा शर्ट पेटला व त्यांच्या हाताला-छातीला तसेच मानेला कानाजवळ गाल भाजून ते जखमी झाले. 

        काल दुपारी ४ च्या सुमारास तोरणा हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. काल याप्रकरणी भाजून जखमी झालेला कूक क मोहनसिंग हारकसिंग सोनार याने श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी महेश जगताप याच्यविरूद्ध भादंवि कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ.बाबर हे पुढील तपास करीत आहेत.