शिवप्रहार न्यूज -शेवगाव डीवायएसपी मुंडेंच्या पथकातील ०३ पोलीसांवर ॲंन्टी करप्शनचा ट्रॅप ... वाळु ट्रक वाल्याकडुन घेतली १५,००० रुपयांची लाच...

शेवगाव डीवायएसपी मुंडेंच्या पथकातील ०३ पोलीसांवर ॲंन्टी करप्शनचा ट्रॅप ...
वाळु ट्रक वाल्याकडुन घेतली १५,००० रुपयांची लाच...
शेवगाव : शेवगाव-नेवासाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांची हफ्तेखोरी उघडी झाली आहे.एका वाळूच्या ट्रकवर कारवाई न करण्यात आल्याने तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. ०१)वसंत कान्हू फुलमाळी (रा. शंकर नगर , पाथर्डी ),०२)संदीप वसंत चव्हाण (रा.पोलीस वसाहत शेवगाव , जि.नगर ) ,०३) कैलास नारायण पवार (रा.शंकर नगर , पाथर्डी ) अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराची वाळूची ट्रक उपविभागिय पोलीस अधिकारी मुंडे यांच्या पथकात असलेल्या तिघा पोलिसांनी ७ एप्रिल रोजी पकडली. त्या ट्रकवर कारवाई न करता सोडण्याचा मोबदल्यात व वाळू वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी हफ्ता म्हणून पैशांची मागणी करण्यात आली होती. लाच मागणी पडताणी कारवाई दरम्यान तिन्ही आरोपींनी पंचांसमक्ष १५,००० रुपयांची लाच स्विकारली आहे.त्यानुसार आरोपींवर काल दि.०३/०५/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीवायएसपी मुंडेंच्या पथकातील तिन्ही आरोपी हे फरार झालेले आहेत.
नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी हरीष खेडकर यांनी ही कारवाई केली.