शिवप्रहार न्यूज - महाराष्ट्रात एक रेमडेसीवीर मिळवण्यासाठी सामान्यांना करावी लागतेय जिवाची राख रांगोळी, युपीत योगी आदित्यनाथांनी मागवली पावणे तीन लाख रेमडेसीवीर औषधे अन् गोळी ...
महाराष्ट्रात एक रेमडेसीवीर मिळवण्यासाठी सामान्यांना करावी लागतेय जिवाची राख रांगोळी,
युपीत योगी आदित्यनाथांनी मागवली पावणे तीन लाख रेमडेसीवीर औषधे अन् गोळी ...
तसेच रेमडेसीवीर चा काळाबाजार करणार्यांची संपत्ती देखील सरकार जमा होणार..
लखनऊ-
उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश च्या जनतेचे कोरोना संकटात पुढे हाल होवु नये म्हणुन चार कंपन्यांकडुन एकुण ०२ लाख ७५ हजार रेमडेसीवीर औषधे मागविली आहे. तसेच आॅक्सीजन वा अन्य गोळ्या देखील मागवल्या असुन कोणत्याही औषधांचा तुटवडा राज्यात होणार नाही असे आश्वासन त्यांनी मेडीया व्दारे जनतेला दिले.
तसेच जो रेमडीसीवीर चा काळाबाजार करेल त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्यात येईल आणि त्याची संपत्ती सरकार जप्त करेन असा दमदार ढोस योगींनी दिला आहे. हा कायदा लावल्यावर आरोपीचा लवकर जामीन होत नाही.महीनोमहीने जेल मध्ये राहावे लागते.
योगींनी मागवलेले रेमडेसीवीर तेथील जनतेला दोन दिवसात मिळणार आहे.महाराष्ट्रात एक रेमडेसीवीर मिळवण्यासाठी रुण्गाच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे.