शिवप्रहार न्यूज- हरेगाव फाटा पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी राजकीय पुढाऱ्यांशी आर्थिक तडजोड करून परस्पर प्रकरणं मिटवतात; म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी.
हरेगाव फाटा पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी राजकीय पुढाऱ्यांशी आर्थिक तडजोड करून परस्पर प्रकरणं मिटवतात; म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी...
श्रीरामपूर- आज श्रीरामपूर टायगर ग्रुप व भाजपा यांच्या वतीने जे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यात म्हटले आहे की,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या अधिपत्याखालील हरेगाव फाटा येथे एक पोलीस चौकी असून याठिकाणी परिसरातील अन्यायग्रस्त नागरिक त्यांना न्याय मिळण्यासाठी तक्रार अर्ज देत असतात. परंतु या ठिकाणी असलेले पोलीस कर्मचारी हे शिरसगाव, अशोकनगर येथील काही पुढारी तसेच राजकीय लोक यांच्याशी आर्थिक तडजोड करून प्रकरण परस्पर मिटवतात. त्यामुळे नागरिकांना न्याय न मिळता त्यांच्यावर नेहमीच अन्याय होत आहे .आजपर्यंत अनेक तक्रारदारांना या पोलीस चौकीतून न्याय मिळालेला नाही . याचे कारण म्हणजे या पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांचे या भागातील गुंड प्रवृत्तीच्या व राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्ती आणि पुढारी यांच्याबरोबर असलेले संबंध होय . यामुळे या पोलिस चौकीत न्याय मिळणे कठीण झाले आहे .ज्यांच्याकडे पैसा आहे ,वजन आहे ते पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर आर्थिक तडजोड करतात त्यांचे काम होते व सामान्य नागरिकांवर मात्र अन्याय होत असतो.
या पोलीस चौकी मध्ये अगर परिसरात एकही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्यांचे फावते आहे ,त्यामुळे हारेगाव पोलीस चौकीच्या बाहेर त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे असे या निवेदनात म्हटले आहे. अशा आशयाचेच निवेदन टायगर ग्रुप श्रीरामपूर व भारतीय जनता पक्षातर्फे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला देखील देण्यात आले. या निवेदनावर टायगर ग्रुप चे अध्यक्ष बबन जाधव ,भाजपाचे जिल्हा संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर जाधव ,तसेच टायगर ग्रुप चे पदाधिकारी संदीप साठे,अविनाश गायकवाड ,विशाल सुरडकर ,मच्छिंद्र बहीरे ,सचिन शरणागत , आकाश शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.