शिवप्रहार न्यूज- लोणी-निर्मळ पिंप्री रस्त्यावर दिवसाढवळ्या ॲक्सीस बॅंकेच्या एटीएम ओपरेटरला दांड्याने मारहाण करुन तब्बल ०४ लाख रुपयांची कॅश लुटली ....
लोणी-निर्मळ पिंप्री रस्त्यावर दिवसाढवळ्या ॲक्सीस बॅंकेच्या एटीएम ओपरेटरला दांड्याने मारहाण करुन तब्बल ०४ लाख रुपयांची कॅश लुटली ....
लोणी (प्रतिनिधी)- लोक डाऊन मुळे अनेक तरुण बेरोजगार झाल्याने अनेकांच्या हाताला काम राहिलेले नाही. त्यामुळेच अलीकडच्या काळात चोऱ्या तसेच लुटीमारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. काल लोणी -निर्मळ पिंपरी रस्त्यावर दिवसाढवळ्या एटीएम ऑपरेटरला दांड्याने मारहाण करून चार लाखांची रोकड पळविण्यात आली. याबाबतची अधिक माहिती अशी की, दिनेश वसंत गाढवे ,वय 30 ,धंदा -एटीएम ऑपरेटर ,राहणार -रांजणगाव खुर्द, तालुका-राहता हे त्यांच्या ताब्यातील ॲक्सिस बँकेचे चार लाख रुपयांची कॅश एटीएम मध्ये लोड करण्यासाठी त्यांच्या मोटरसायकलवरून जात असताना त्यांच्या मोटरसायकलीच्या पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडी मधून तीन अनोळखी चोरट्यांनी येऊन त्यांची गाडी अडवून त्यांच्याशी झटापट केली. तसेच लाकडी दांड्याने गाढवेंच्या डोक्यावरील हेल्मेटवर मारून लाकडी दांड्याचा धाक दाखवून त्यांच्या ताब्यातील चार लाख रुपयांची बॅग जबरदस्तीने ओढून चोरी करुन नेली. बॅगमध्ये चार लाख रुपये रोख रकमेसह एटीएमच्या चाव्या, बँकेचे कागदपत्र व फिर्यादी चे आधार कार्ड असा ऐवज होता. घटनास्थळी श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सौ. दिपाली काळे ,डीवायएसपी मदने ,पोलीस निरीक्षक भोये यांनी भेट दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलिस स्टेशनचे पोसई सूर्यवंशी हे करीत आहेत. पिंपरी निर्मळ शिवारात दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.