शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात माजी नगराध्यक्ष व नगरसेवकाची एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार...
श्रीरामपुरात माजी नगराध्यक्ष व नगरसेवकाची एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार...
श्रीरामपूर - श्रीरामपूर नगर पालिकेसमोर काल माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे व नगरसेवक रवी पाटील यांच्यामध्ये एकमेकांकडे पाहण्यावरुन जोरदार खडाजंगी झाली होती. थेट अरेतुरे पर्यंत या दोघांनी एकमेकांना हमरीतुमरी केली होती.
यावेळी माजी नगराध्यक्ष कांबळे यांनी नगरसेवक रवी पाटील यांच्यावर वाळूच्या धंद्याचा आरोप लावला तर नगरसेवक रवी पाटील यांनी माजी नगराध्यक्ष कांबळे यांच्यावर पीपल्स बँक बुडवल्याचा आरोप केला होता.
यावरून दोन्ही नेत्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन कडून या प्रकरणाची पुढील चौकशी चालू आहे.