शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर शहरात ५-६ दरोडेखोरांनी फोडले ५-६ घरं...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूर शहरात ५-६ दरोडेखोरांनी फोडले ५-६ घरं...

श्रीरामपूर शहरात ५-६ दरोडेखोरांनी फोडले ५-६ घरं...

श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती भागामध्ये असणाऱ्या गोरक्षनाथ मंदिर परिसरात काल सोमवारी रात्री ५-६ दरोडेखोरांच्या टोळक्याने दरोडा टाकत या भागातील ५-६ घर फोडल्याची घटना घडली आहे. 

      यामध्ये प्रशांत जाधव, विवेक जाधव,सौ सुषमा बोकन, विठ्ठल वाघ,श्री.भोजने इत्यादींचे घर फोडल्याची ची प्राथमिक माहिती मिळत आहे.यामध्ये मोठा मुद्देमाल चोरून नेल्याची चर्चा स्थानिक करत आहेत.आज पोलीसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.दरम्यान हे दरोडेखोर चोरटे सीसीटिव्हीमध्ये देखील कैद झाले आहे.