शिवप्रहार न्युज - तालुक्यात बिबट्याचा दोघांवर हल्ला तर एक बोकड मारला ...

शिवप्रहार न्युज -  तालुक्यात बिबट्याचा दोघांवर हल्ला तर एक बोकड मारला ...

तालुक्यात बिबट्याचा दोघांवर हल्ला तर एक बोकड मारला ...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून ०२ दिवसात दोघांवर बिबट्याने हल्ला केला आहे. तसेच बेलापूरच्या ऐनतपूर परिसरात दुसऱ्या एका बिबट्याने एका बोकडाचा बळी घेतला. 

        शनिवारी बिबट्याने भोकर मधील वृद्ध अंबादास तुकाराम ढोकणे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यांच्यावर श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू असतानाच काल रविवारी सायंकाळी पुन्हा बिबट्याने भोकर परिसरातील मुठेवाडगाव रोडने मोटरसायकलवर चाललेला तरुण विशाल दुधाळे याच्यावर झेप घेत हल्ला केला. सुदैवाने बिबट्याची झेप मोटरसायकलच्या मागील बाजूला गेल्याने विशाल जखमी होता होता वाचला. 

       तसेच काल रविवारी रात्री बेलापूरच्या ऐनतपूर परिसरात अमोलिक वस्तीवर बिबट्याने एका बोकडाच्या नरडीचा घोट घेत त्याचा बळी घेतला आहे.

      दरम्यान भोकरमध्ये दोन दिवसात दोघाजणांवर बिबट्याने हल्ला केल्याने भोकर व ऐनतपूर परिसरातील शेतकऱ्यांसह गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून त्याला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.