शिवप्रहार न्युज - शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू…

शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू…
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – संपूर्ण शहरवासीयांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शहराच्या विस्तारीत पाणीपुरवठा योजनेच्या कामास सुरुवात झाली असून या योजनेसाठी एकुण १७८ कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केले आहेत.
श्रीरामपूरच्या लोकसंख्या वाढीनुसार पुढील २५ वर्षांची शहराच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन श्रीरामपूर शहराच्या साठवण तलावाचे विस्तारीकरण व खोलीकरण करण्यात येत आहे.शहरात सुमारे १२ एकर जागेमध्ये अतिरिक्त पाणीसाठा होणार आहे.तलावाचे काम युद्ध पातळीवर अहोरात्र सुरू आहे.