शिवप्रहार न्यूज- “शिवप्रहार” च्या मागणीला प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हिरवा कंदील…
“शिवप्रहार” च्या मागणीला प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हिरवा कंदील…
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवून कोरडा दिवस पाळला जातो.परंतु श्रावण महिना हा हिंदूंचा पवित्र महिना असल्यामुळे या महिन्यातील शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येऊ नये अशी मागणी शिवप्रहार प्रतिष्ठानने नगर परिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी श्री.अनिल पवार व मुख्याधिकारी श्री.गणेश शिंदे यांच्याकडे केली होती.
त्यानुसार या दोन्ही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी हिंदू समाजाच्या भावनांचा आदर करत दिनांक 30 जुलै 2022 ते 27 ऑगस्ट 2022 पर्यंत शहरात दर शनिवारी नियमित वेळेत पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान गेल्यावर्षी सन 2021 मध्ये देखील शिवप्रहार प्रतिष्ठानने श्रावण मासामध्ये हिंदू समाजाचा पवित्र महिना या कारणाने शनिवारी कोरडा दिवस पाळू नये अशी मागणी तत्कालीन नगराध्यक्षा अनुराधाताई अदिक यांच्याकडे केली होती.त्यानुसार त्यांनी देखील मागच्या वर्षी श्रावण महिन्यात शनिवारी कोरडा दिवस न पाळता त्या महिन्यात नियमित पाणीपुरवठा केला होता.
नगरपालिका प्रशासक प्रांत अधिकारी श्रीअनिल पवार मुख्याधिकारी श्री.गणेश शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल हिंदू समाजाकडून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.