शिवप्रहार न्युज - नवऱ्याला सोडून दे,मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो म्हणत महिलेचा श्रीरामपुरात विनयभंग…

नवऱ्याला सोडून दे,मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो म्हणत महिलेचा श्रीरामपुरात विनयभंग…
श्रीरामपूर - श्रीरामपूर एका 35 वर्षीय विवाहित महिलेला पॅन कार्ड काढण्याचा बहाणा करून तिला आपल्या कार्यालयात बोलवुन तिचा विनयभंग करण्याची घटना श्रीरामपूर शहरात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,श्रीरामपूर शहरातील मनोजकुमार बोरा याने एका 35 वर्षीय विवाहित तरुणीला आपल्याकडे पॅन कार्ड काढण्याचा बहाणा करून छ.शिवाजी महाराज चौकातील ॲाफिसला बोलावले आणि शेजारचा गाळा ब्युटी पार्लरसाठी घ्या,तो तुम्हाला दाखवतो असे म्हणून तेथे तिला घेऊन जाऊन तिच्या साडीचा पदर ओढून,तिला बळजबरीने स्पर्श करत,नवऱ्याला सोडून दे,मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो,लागेल तेव्हढे पैशे देतो असे बोलून या महिलेचा विनयभंग बोराने केला.
याप्रकरणी या 35 वर्षे पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी मनोजकुमार बोरा याच्या विरोधात गुन्हा श्रीरामपूर शहर पोलिसात दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास शहर पोलिसांकडून चालू आहे.