शिवप्रहार न्युज - दारूड्या मुलाकडून बापाला कु-हाडीने मारहाण...

शिवप्रहार न्युज -  दारूड्या मुलाकडून बापाला कु-हाडीने मारहाण...

दारूड्या मुलाकडून बापाला कु-हाडीने मारहाण...

   श्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर शहराजवळील शिरसगाव येथे दारूड्या मुलाकडून विनाकारण बापाला शिवीगाळ करत कु-हाडीने मारहाण करत जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिरसगाव येथे राहणारे नंदू रामराव त्रिभूवन, वय-५८, धंदा-इस्त्री दुकान हे शुक्रवारी दुपारी ३.३० वा. आपल्या राहत्या घरी इस्त्रीचे काम करत असताना तेथे त्यांचा मुलगा अमोल याने दारू पिऊन येत विनाकारण त्यांना शिवीगाळ केली.

  यावेळी नंदू यांनी मुलाला तू विनाकारण मला शिवीगाळ का करत आहे ? असे विचारल्याने अमोल याने रागात कुऱ्हाड घेवून त्यांच्या हातावर व करंगळीवर मारून त्यांना जखमी केले आणि तेथून निघून गेला. नंदू त्रिभूवन यांना चांगलाच मार लागल्याने तासभर ते जागेवरच बेशुद्ध पडून होते. त्यानंतर त्यांच्या भावाने त्यांना रूग्णालयात दाखल केले. 

   या मारहाण प्रकरणी नंदू त्रिभूवन यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून मारहाण करणारा आरोपी मुलगा अमोल याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनि. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.