शिवप्रहार न्यूज- मास्क लावलेल्या महिलेने श्रीरामपुरातील बँकेतून ५० हजार चोरले…
मास्क लावलेल्या महिलेने श्रीरामपुरातील बँकेतून ५० हजार चोरले…
श्रीरामपूर - शहरातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत कामकाजानिमित्त आलेल्या अशोक भाऊसाहेब राहणे, राहणार- सिद्धिविनायक पार्क,श्रीरामपूर यांच्या बॅगेतून 50 हजार रुपयांची रोख रक्कम तोंडाला मास्क लावलेल्या एका अनोळखी महिलेने चोरून नेली.
याप्रकरणी अशोक भाऊसाहेब राहणे यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात या अनोळखी महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांकडून या चोरट्या महिलेचा शोध चालू आहे.