शिवप्रहार न्युज - थत्ते मैदान परिसरात बसणार ०४ सोलर हायमास्ट दिवे…

थत्ते मैदान परिसरात बसणार ०४ सोलर हायमास्ट दिवे…
श्रीरामपूर- शहरातील सर्वाधिक गर्दी होणारे ग्राऊंड थत्ते मैदान परिसरात लाईटचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील साहेब व मा.खा.डॉ.सुजयदादा विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली मा.नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांच्या पुढाकाराने ४ सोलर हायमास्ट बसविण्याच्या कामाचा शुभारंभ आज पार पडला.
निर्भीड पत्रकारितेने थत्ते मैदानाचा “भूखंडाचा श्रीखंड” होण्यापासून वाचवण्यात महत्वाची भुमिका बजावणारे ज्येष्ठ पत्रकार मनोजभाऊ आगे यांच्यासह या मैदानाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या डेली वर्क आऊट ग्रुपचे योग गुरु,विधिज्ञ सुशील पांडे यांच्यासह मार्गदर्शकांच्या शुभहस्ते पार पडला.
सोलर हायमास्टमुळे थत्ते ग्राऊंड परिसरातील अंधार कायमस्वरूपी दूर करण्याचा आमचा प्रयत्न असून आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात लाल मातीच्या जॉगिंग ट्रॅकसह थत्ते मैदान परिसर चांगल्या प्रकारे “डेव्हलप” करण्यात आल्याचे समाधान आहे असे मा.नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी सांगितले.