शिवप्रहार न्यूज- अवैध धंदयावर छापे टाकुन एकुण ३ आरोपी विरुद्ध कारवाई; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

शिवप्रहार न्यूज- अवैध धंदयावर छापे टाकुन एकुण ३ आरोपी विरुद्ध कारवाई; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

अवैध धंदयावर छापे टाकुन एकुण ३ आरोपी विरुद्ध कारवाई; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

नगर -आज 19 मार्च 2022 अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर , पोहेकॉ बबन मखरे , पोहेकॉ देवेंद्र शेलार , पोलीस नाईक शंकर चौधरी पोलीस नाईक सचिन आडबल , पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे , पोलीस कॉन्स्टेबल मयुर गायकवाड व चोपोहेकॉ संभाजी कोतकर यांचे स्वतंत्र पथक नेमुन जिल्हयातील अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिला.

         पथकातील पोलीस अंमलदार यांनी नगर तालुक्यामध्ये कारवाईची विशेष मोहिम राबवून ०३ ठिकाणी छापे टाकून एकूण १,०४,५०० / रु . किं . चा मुद्देमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे ३ आरोपी विरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत . १ ) नगर तालुका पो.स्टे . गुरनं . १६०/२०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - ३८,५०० / -रु . किं . ची त्यामध्ये ३५ लि . तयार दारु व ७०० लि . गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे आरोपी : - कानिफनाथ भिमोजी कळमकर रा . कळमकरवस्ती , नेप्ती , ता . नगर ( फरार ) २ ) नगर तालुका पो.स्टे . गुरनं . १६ ९ / २०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - ४३,००० / -रु . किं . ची त्यामध्ये ३० लि . तयार दारु व ८०० लि . गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे आरोपी : - राजू छबु पवार वय ३० , रा . नेप्ती , ता . नगर ३ ) नगर तालुका पो.स्टे . गुरनं . १६२ / २०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) प्रमाणे जप्त मुद्देमाल : - २३,००० / -रु . किं . ची त्यामध्ये ३० लि . तयार दारु व ४०० लि . गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे आरोपी : - राजेश बाजीराव पवार वय ४२ , रा . नेप्ती , ता . नगर.

        सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार आग्रवाल, अहमदनगर ,उपविभागीय पोलीस अधीकारी ग्रामीण विभाग अजित पाटील यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी अमंलदार यांनी केलेली आहे.