शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील विद्यार्थिनी स्नेहाचा मृत्यू…
श्रीरामपुरातील विद्यार्थिनी स्नेहाचा मृत्यू…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर एक गोंधवनी परिसरात राहणारी विद्यार्थिनी स्नेहा दत्तात्रय दळवी,वय 17 वर्ष हिला आजारपणामुळे मागच्या महिन्यात 11 जून रोजी नगर येथील न्युरान प्लस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेव्हापासून या तरुणीवर न्यूरान प्लस रुग्णालय, नगर येथे उपचार चालू होते.
परंतु उपचारादरम्यान ०१ जुलै रोजी स्नेहा दत्तात्रय दळवी हिचा मृत्यू झाला. त्यानुसार रुग्णालयाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून काल श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमक्या कोणत्या आजारामुळे विद्यार्थिनी स्नेहा दळवी ही मयत झाली? कोणत्या आजारासाठी तिच्यावर उपचार चालू होते ? याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार हापसे हे करीत आहेत.
अल्पवयीन विद्यार्थिनी स्नेहा दळवी हिच्या अकस्मात मृत्यूमुळे दळवी परिवारासह गोंधवणी भागात प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.