शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्लात शेळी व कुत्रा ठार…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्लात शेळी व कुत्रा ठार…

श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्लात शेळी व कुत्रा ठार…

श्रीरामपूर(प्रतिनिधी)- तालुक्यातील पढेगाव येथील काळेवस्ती परिसरात गुरुवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून शेळीला ठार केले होते.तर काल रात्री जुने गावठाण परिसरात पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला. 

      गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने तात्काळ दखल घेऊन येथे पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.