शिवप्रहार न्यूज- लाखोंचा अपहार;श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी व सरपंचावर गुन्हा…

शिवप्रहार न्यूज- लाखोंचा अपहार;श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी व सरपंचावर गुन्हा…

लाखोंचा अपहार;श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी व सरपंचावर गुन्हा…

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील निपाणीवडगाव ग्रामपंचायतीत १९ लाख ३६ हजार ५०५ रूपयांचा अपहार केला म्हणून सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यावर काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने ग्रामपंचायतीत कशाप्रकारे भ्रष्टाचार व गैरप्रकार चालतो हे समोर आले आहे.

       याबाबत अधिक माहिती अशी की, रावसाहेब दगडू अभंग, धंदा - नोकरी, रा. कांदामार्केटच्या मागे, खिलारी रस्ता, श्रीरामपूर यांच्या फिर्यादीवरून आरोपी ग्रामविकास अधिकारी विजय भानुदास सोनवणे, रा. कान्हूरपठार, ता. पारनेर व सरपंच सौ. शिला दिनकर पवार, रा. निपाणीवडगाव, ता. श्रीरामपूर यांच्याविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम ४०८, ४०९, ४२०, ३४ प्रमाणे ठकबाजी,फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

       फिर्यादी अभंग यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, निपाणीवडगाव ग्रामपंचायत कार्यालयात दि. १.४.२०१६ ते दि.३१.१.२०१७ या कालावधीत आरोपी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी विजय भानुदास सोनवणे याने रक्कम रू.८ लाख ९६ हजार ३२० व सरपंच सौ. शिला दिनकर पवार यांनी रक्कम रू.१० लाख ४० हजार १८५ रूपये असे एकूण रक्कम रू.१९ लाख ३६ हजार ५०५ रूपये सरकारी रक्कमेचा अपहार केला. पोनि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई सुरवाडे हे पुढील तपास करीत आहेत.